Header AD

रक्तदान आपलं सामाजिक कर्तव्य- हेमा नरेंद्र पवार


■हेमा पवार यांनी वाढदिवसा निमित्त समाजा समोर ठेवला आदर्श १०० जणांनी रक्तदान करून हेमा पवार यांना दिल्या शुभेच्छा...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य असून प्रत्येकाने ते निःस्वार्थ भावनेने केले पाहिजे असे प्रतिपादन कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी केले.  कोरोना काळातील दुसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णांना या काळात आपला जीव गमवावा लागला.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता वर्तवल्या जात असून  रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी हेमा नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण विकास फाउंडेशनरोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडरोट्रॅक्ट क्लब ऑफ कल्याण डायमंड व संकल्प ब्लड बँकेने कल्याणमधील पारनाका येथील राजस्थान हॉल मध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले यामध्ये शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
हेमा पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही भेटवस्तू न स्वीकारता रक्तदान शिबिर आयोजित केल्याने कल्याणमधील अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन हेमा नरेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या.यामध्ये कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेमोहने टिटवाळा अध्यक्ष शक्तीवान भोईरठाणे विभाग प्रभारी राजाभाऊ पातकरजिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रेभाजपा जेष्ठ नेते दिनेश तावडेओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल पंडितभाजपा शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारेयुवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाणपरिवहन समिती सदस्य कल्पेश जोशीरोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे चार्टर् अध्यक्ष बाळासाहेब एरंडेअध्यक्ष निशिगंधा वनसुत्रेसचिव संजय पैठणकरप्रोजेक्ट प्रमुख राजेश चासकररोट्रॅक्ट क्लब ऑफ कल्याण डायमांडचे चार्टर अध्यक्ष विवेक जगदळअध्यक्ष अभिजित बावस्करसचिव श्रेया आव्हाडप्रोजेक्ट प्रमुख अभिषेक शिंदेनुपूर डोंबे व संकल्प ब्लड बँक ची संपूर्ण टीमआर के सिंगकिशोर खैरनारप्रीती दीक्षितआणि कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान आपलं सामाजिक कर्तव्य- हेमा नरेंद्र पवार रक्तदान आपलं सामाजिक कर्तव्य- हेमा नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on July 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads