Header AD

उद्या दि. 6 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात निदर्शने आंदोलन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार




मुंबई दि. 5  - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेश नावर उद्या मंगळवार  दि. 6 जुलै रोजी आझाद मैदानात पदोन्नती मधील आरक्षण;मुस्लिम समाजाला आरक्षण; बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा गावात झालेला दलित कुटुंबावरील हल्याचा निषेध; राज्यातील वाढते दलित अत्याचार रोखण्याच्या मागणी सह  विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात   निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.



         अनुसूचित जाती जमातींना आणि  इतर मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे ; मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे .



         बुलडाणा जिल्हातील खामगाव तालुक्यात चितोडा गावातील हिवराळे या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी  या सह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या दि.6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे. 

उद्या दि. 6 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात निदर्शने आंदोलन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार उद्या दि. 6 जुलै रोजी रिपब्लिकन पक्षाचे  आझाद मैदानात निदर्शने आंदोलन  केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार Reviewed by News1 Marathi on July 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads