Header AD

महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई, रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी

 

■शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा सोबत इतर अधिकारी....              


ठाणे,  प्रतिनिधी  :  राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मान्सूनपूर्व तयारी करण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नालेसफाई, खड्डे बुजवणे, रस्ते दुरुस्ती आणि इतर अत्यावश्यक कामे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली असून आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली.


        आज सकाळी 11.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नितीन कंपनी येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेविकांशी संवाद साधत प्रभागातील अडचणी संबंधित तसेच करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. 


          यावेळी नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, नगरसेवक संतोष वडवले, एकनाथ भोईर, राम रेपाळे, दीपक वेतकर, नगरसेविका सौ. सुवर्णा कांबळे, श्रीमती केवलादेवी यादव, सौ. प्रभा बोरिटकर, सौ. निर्मला कणसे, सौ. मीनल संखे, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, उप नगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.


        महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून कॅडबरी जंक्शन येथील सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून दुरुस्तीचे काम तात्काळ काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी रस्ता खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.


       पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच ज्या ठिकाणी पाणी साचेल तेथील पाण्याच्या निचरा होण्याच्या दृष्टीने उपसा पंप लावणे तसेच इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या.


       यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोरम मॉल नाला, कामगार नाला, आंबेवाडी नाला इंदिरानगर, नवीन पासपोर्ट ऑफीस, तसेच केळकर नाल्याची पाहणी केली. कामगार नाल्याचे रुंदीकरण करण्यासोबतच नाले सफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या.


     दरम्यान ज्ञानेश्वर नगर, इंदिरानगर रोड क्र. २२, साठेनगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करून पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याचे कॉक्रीटीकरण पूर्ण करण्यासोबतच रस्त्याच्या बाजूला असणारे मातीचे ढीग, कचरा तात्काळ साफ करून नवीन दुभाजक बसविण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागास दिले.                  


महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई, रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई, रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads