Header AD

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहारातील रस्ते दुरुस्तीच्या कामास वेग

 


ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्रभागासमितीनिहाय सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामांची छायाचित्रे...


ठाणे , ६ ;-  पावसाळयात खड्ड्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू नये यासाठी सर्व रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरातील सर्व प्रभाग समितीमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. 


    पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्रभागासमितीनिहाय रस्ते दुरुस्ती कामे करण्यात येत आहे


    लाेकमान्य सावरकरनगर  प्रभाग समिती, नाैपाडा प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती आदी ठिकाणी रस्ते दुरुस्ती सुरू असून नितीन कंपनी ते तीन हात नाका रस्त्याच्या कामास देखील सुरुवात करण्यात आली आहे. 



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहारातील रस्ते दुरुस्तीच्या कामास वेग पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहारातील रस्ते दुरुस्तीच्या कामास वेग Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads