Header AD

हिपी आणि अँड पिक्चर्सद्वारे 'डान्स फुलऑन' स्पर्धेची घोषणा

 मुंबई, २१ जून २०२१ : यंदाच्या जागतिक संगीत दिनानिमित्त भारतातील वेगाने-वाढणाऱ्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म हिपीने 'डान्सफुलऑन'  स्पर्धेची घोषणा करण्यासाठी अँड पिक्चर्ससोबत भागीदारी केली आहे. २३ जूनपर्यंत चालणा-या या स्पर्धेअंतर्गत देशभरातील नृत्यप्रेमींना हिपीवर सादरीकरण करण्याची तसेच २० सेकंदाची हूक स्टेप रिक्रिएट करण्याची संधी दिली जाईल. हिपीने कुशल डान्सर आणि बॉलिवूडचे लोकप्रिय डान्स डायरेक्टर पियुष भगत यांच्यासोबत भागीदारी केली आहे. अँड पिक्चर्सच्या ऑन नही, फुल ऑन या गाण्याच्या बिट्ससोबत कोरिओग्राफी आणि हूक स्टेप करण्याकरिता त्याची मदत घेतली जाईल.     या स्पर्धेद्वारे यूझर्सना इन्स्टंट सोशल मीडिया सेन्सेशन बनण्याची संधी मिळेल. या परफॉर्मन्सचे मूल्यांकन पियुष भगत स्वत: करतील आणि शीर्ष ५ सहभागींना ५०,००० रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मिळेल.        झी डिजिटल पब्लिशिंगचे सीईओ आणि हिपीचे सीबीओ श्री रोहित चड्ढा म्हणाले, “आपल्या भारतीयांना बॉलिवूड म्युझिकच्या ट्यूनवर डान्स करायला आणि डोलायला आवडते. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने, #डान्सफुलऑन हे चॅलेंज घेऊन आम्ही प्रेक्षकांना चकित करु इच्छितो. आमच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना युनिक हूक स्टेप तयार करताना आम्हाला पहायचे आहे. या चॅलेंजसह, सर्वांना प्रभावित करणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट डान्सर्सचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. हिपीमध्ये आम्ही सतत नव्या सुविधा वाढवणे आणि आमच्या यूझर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो.”

हिपी आणि अँड पिक्चर्सद्वारे 'डान्स फुलऑन' स्पर्धेची घोषणा हिपी आणि अँड पिक्चर्सद्वारे 'डान्स फुलऑन' स्पर्धेची घोषणा Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads