Header AD

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याण करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

■शहरभर नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  निसर्गाच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहचल्या असून अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी शाळेच्या एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाचा शुभारंभही नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नूतन विद्यालयाच्या मैदानात ५ वर्षांपूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लावलेल्या झाडाचा ५ वा वाढदिवस पवार यांच्याच हस्ते करण्यात आला. यावेळी अशोकपामचिंचकडू लिंब यासह अनेक औषधी वनस्पती असलेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.


जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणवासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रभागातसोसायटी व चाळ परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कल्याणकरांनी मोठा प्रतिसाद देत अनेक प्रभागात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते यासर्व ठिकाणी नरेंद्र पवारांनी हजेरी लावून वृक्षारोपण केले.


प्रभाग क्र.३२ सिध्देश्वरआळी येथे  नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. फडके मैदान परिसरात भाजपाच्या प्रिया शर्मा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भावना मनराजानम्रता चव्हाणज्योतिताई भोईर आदी उपस्थित होते. प्रभाग २ कोलीवळी येथील वृंदावन सोसायटी परिसरात नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय कारभारीमिलिंद सिंगमेघनाथ भंडारीभाऊराव तायडेनम्रता चव्हाण आदी उपस्थित होते.


प्रभाग ४ मध्ये गौरीपाडा येथे भाजपा कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुन म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला मा आमदार नरेंद्र पवार,महिला अध्यक्षा मीरा खरेवॉर्ड अध्यक्ष महेश केणेजेष्ठ कार्यकर्ते श्याम केणे आदी उपस्थित होते. प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण आयोजित केले. 

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याण करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याण करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads