Header AD

अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद


■आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन कडून मदती चा हात....कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  अनाथ आश्र मातील विद्या र्थ्यांना मदत करत आविष्कार एज्युकेअर फाउंडेशनने त्यांच्या   चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. प्रत्येक वर्षी आविष्कारच्या वतीने सातत्यपूर्ण "एक हात मदतीचाएक हात जाणिवांचा" या उपक्रमाअंतर्गत आवंतांनावंचितांना मदत केली जाते. हे काम गेल्या दहा वर्षांपासून आविष्कार फाउंडेशनचे सचिन जाधवविनोद शेलकरगिरीष मंजुळे व टीम करत आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूकरिता सध्याच्या कोरोना विषाणूंमुळे उध्दभवलेल्या भयानक परिस्थितीत अनेक अनाथ आश्रमातील मुलांना अन्न धान्य  व इतर सेवांची नितांत गरज असल्याचे आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन यांच्या लक्षात आले. यासाठी लोक सह भागातून,डाळतांदूळगहूतेलहळदतिखटमीठवस्तू रुपाने मदत करण्याचे आवाहन आविष्कारच्या फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते.यासर्व वस्तूंसाठी  संदेश परबरेखा जाधवस्वामिनी निष्कलानंदादलजित बोन्स आशा  सहृदयी व्यक्तींनी यासाठी मदत केली. यात तेलडाळीपोहेबटाटेतांदूळमीठ मासलेगव्हाचे पीठ 50 किलोगहू 30 कोलो आशा पदार्थांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य आविष्कार एज्युकेअर फौंडेशनच्या वतीने टिटवाळा येथील कृपाछाया बालआश्रम येथे प्रत्यक्ष देण्यात आले.यावेळी त्या विद्यार्थ्याच्या इतर गरजा ही जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना बोलते केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव सांगत छान छान गाणी म्हटली. त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहून विकास पाटील यांनी त्वरित बीस्किटांची व्यवस्था केली.  यावेळी आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक सचिव विनोद शेलकर,  उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटीलसेवानिवृत्त मुख्यध्यपक एन. एम. भामरे,  सुभाष सरोदे आदी उपस्थित होते. 

अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads