Header AD

बी.एल.लो चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची तहसील दारांकडे मागणी


■शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि बी.एल.ओ. चे काम शिक्षकांनी उपस्थित केला सवालकल्याण , कुणाल  म्हात्रे  : शिक्षकांना दिलेले बी.एल.लोचे आदेश रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांकडे केली असून शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि  बी.एल.ओ.चे काम असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववीचे गुण व इयत्ता दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाचे काम शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविल्याने निकाल तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यातच विधानसभा क्षेत्र  १४२ मतदार संघातील शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामाचे आदेश काढण्यात आले आहेत.  शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्तीदुबारमयतस्थलांतरितछायाचित्र चिटकवणे नोटिसा बजावणे इत्यादी कामे करण्याकरिता आदेश काढण्यात आले आहेत. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटीलसचिव अनिल पाटील व इतर पदाधिकारी ए.व्ही. पाटीलआप्पाराव कदम यांनी विधानसभा क्षेत्र १४२ चे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व  निवेदनाद्वारे बी.एल.ओ.चे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

बी.एल.लो चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची तहसील दारांकडे मागणी बी.एल.लो चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची  तहसील दारांकडे मागणी Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads