Header AD

मुसळधार पावसात महापालिका आयुक्त रस्त्यावर : नाले सफाई, पाणी साठलेल्या ठिकाणांची केली पाहणी

 


■मुसळधार पावसातदेखील शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत इतर अधिकारी....


ठाणे , प्रतिनिधी  :  हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासून अतिवृष्टी सुरु झाली असून आज मुसळधार पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. 


               दिनांक 9 जून ते 12 जून, 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर आज पासून शहरात जोरदार पावसाला सुरु झाली आहे. गेले दोन दिवस महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाची तसेच सखल भाग, रस्ते दुरूस्ती कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. 

        

           आज सकाळी 11.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाण्यातील पातलीपाडा येथून मुसळधार पावसात नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली.

          

             या पाहणी दौऱ्यामध्ये स्थायी समिती सभापती संजय भोईर,आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती सौ. निशा पाटील, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ.राधिका फाटक, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओळवेकर, नगरसेविका सौ. साधना जोशी, सौ.विमल भोईर, सौ.कविता पाटील, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

         

           महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पातली पाडा, बटाटा कंपनी, लोढा लक्झोरीया, थिराणी शाळा, भीमनगर, विवियाना मॉल तसेच लोढा येथील नाल्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिवृष्टी पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेविकांशी संवाद साधत प्रभागातील अडचणी संबंधित तसेच करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

      

            अतिवृष्टीच्या पहिल्याच दिवशी शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही यासाठी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पावसामुळे वाहून आलेला कचरा तात्काळ उचलून नाल्याचे प्रवाह मोकळे करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुसळधार पावसात महापालिका आयुक्त रस्त्यावर : नाले सफाई, पाणी साठलेल्या ठिकाणांची केली पाहणी मुसळधार पावसात महापालिका आयुक्त रस्त्यावर : नाले सफाई, पाणी साठलेल्या ठिकाणांची केली पाहणी Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads