Header AD

ठाण्यात जेष्ठ नागरिक व अपंगा साठी 'कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर सुरु महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते लसीकरण सेंटरचा शुभारंभ

 


ठाणे , प्रतिनिधी  ;  ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक व 45 वर्षावरील अपंगासाठी कोविड-१९ मोबाईल लसीकरण सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार असून महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते महापालिका भवन येथे या मोबाईल लसीकरण  सेंटरचा शुभारंभ  करण्यात आला.


          यावेळी उप महापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, परिवहन समिती सभापती विलास जोशी, गलिच्छवस्ती निर्मूलन समिती अध्यक्षा सौ. साधना जोशी,  नगरसेवक उमेश पाटील, नगरसेविका नंदिनी विचारे, सौ. रुचिता मोरे, सौ. मालती पाटील, सौ. शर्मिला गायकवाड-पिंपळोलकर, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, परिवहन समिती सदस्या सौ.पूजा वाघ, परिवहन समिती सदस्य नितीन भोईर, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.


         60 वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर ये-जा करण्यासाठी त्रास होवू नये यासाठी त्यांना घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे.


             या कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये १ वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 1 डेटा ऑपरेटर, आणि 1 निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


             शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत 100 डोस देण्यात येणार असून एखाद्या नागरिकांकडे ओळखपत्र नसल्यास देखील लस देण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार आहे. बसमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली असून जेष्ठ नागरिकांना बसमध्ये चढता येत नसल्यास खाली उतरून लस देण्यात येणार आहे.ठाण्यात जेष्ठ नागरिक व अपंगा साठी 'कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर सुरु महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते लसीकरण सेंटरचा शुभारंभ ठाण्यात जेष्ठ नागरिक व अपंगा साठी 'कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटर सुरु महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते लसीकरण सेंटरचा शुभारंभ  Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads