Header AD

भूमाफियांचा डोळा असलेल्या भूखंडावर साकारले अप्रतिम उद्यान■उद्यानात शिवरायांसह महापुरुषांच्या विचारांना उजाळा विरोधी पक्ष नेत्यांचा उत्कृष्ठ उपक्रम...ठाणे (प्रतिनिधी) -  सध्या एखादा मोकळा भूखंड दिसला की त्यावर भूमाफियांकडून अतिक्रमण केले जात असते. मात्र, व्हीजन असलेले नेतृत्व असले की अशा भू माफियांची दादागिरी मोडीत काढायला वेळ लागत नाही. गृहनिर्माण मंत्री डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधीपक्ष  नेते अश्रफ शानू पठाण यांनीही अशीच कृती केली आहे.             मोकळा असलेला कौसा येथील घासवाला कंपाऊंडच्या भूखंडावर पठाण यांनी अद्ययावत उद्यानाची निर्मिती करून मुंब्रा कौसावासियांची बागेची कमतरता दूर केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी एलईडीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.            कौसा येथे घासवाला कंपाऊंड नावाचा एक मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण करण्यासाठी अनेक भूमाफियांकडून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हा भूखंड भूमाफियांच्या ताब्यात जाण्याआधीच या ठिकाणी अद्ययावत असे उद्यान उभे करण्याची कल्पना विरोधी पक्ष नेते अश्रफ  शानू पठाण यांनी मांडली. त्या दृष्टीकोनातून  या एकर भूखंडावर उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.          गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या उद्यानाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे,ज्येष्ठ नेते सय्यद अली अश्रफ (भाईसाहब), कळवा -मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, सर्व नगरसेवक-नगरसेविका, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी  उपस्थित होते.            या उद्यानाला मौलाना शोएब अहमद खान यांचे नाव देण्यात आले आहे. या बागेत लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांचे छायाचित्र झळकणार आहे. एका बाजूला हिरवळ, जाॅगींग ट्रॅक,  लहान मुलांसाठी खेळणी आदी रचना या उद्यानात करण्यात आली आहे. याच भागात भावी काळात शाळा उभारण्याचा मानसही शानू पठाण यांनी व्यक्त केला आहे.

भूमाफियांचा डोळा असलेल्या भूखंडावर साकारले अप्रतिम उद्यान भूमाफियांचा डोळा असलेल्या भूखंडावर साकारले अप्रतिम उद्यान Reviewed by News1 Marathi on June 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads