Header AD

ओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवी डिजिटल मोहीम

 मुंबई, ९ जून २०२१ : ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत 'टुवर्ड्सअब्युटीफुलटुमॉरो' ही नवी डिजिटल मोहीम सुरु केली आहे. शाश्वततेसाठी वचनबद्ध असलेले ओरिफ्लेम त्यांच्या डिजिटल प्रेक्षकांना, ब्युटी कंटेनर्सचा सर्जनशील पद्धतीने पुनर्वापर करण्यास प्रोत्साहित करेल. प्रेक्षकांसाठी हे नवे आव्हान असेल.         ओरिफ्लेमने स्थापनेपासूनच हवामान, पाणी आणि जंगल यावर भर देत एक समग्र शाश्वत धोरण अंगीकारले आहे. निसर्गाप्रती प्रेम आणि वचनबद्धतेमुळे ब्रँडने आपल्या अवतीभोवतीच्या जगावरील परिणाम ओळखले आणि ते समजून घेतले. ओरिफ्लेमचे कामकाज आणि एकूणच मूल्यसाखळीद्वारेही हे जाणून घेतले.        ओरिफ्लेम ही हवामान केंद्रीत कंपनी असून तिने जीएचजी उत्सर्जनात २०२० पासून ७६ टक्के कपात केली आहे. ओरिफ्लेमच्या सर्व साइट्सवर २०१८ पासून १००% नूतनीकरणायोग्य वीजेचा वापर केला जातो. भारतातील सर्व उत्पादन प्रकल्पाच्या ठिकाणी जमलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. यातील प्लास्टिक पॅकेजिंग १०० टक्के रिसायकल केलेले तसेच कचरा व्यवस्थापन भागीदारांमार्फत त्यावर सह प्रक्रिया केली जाते. २०२० मध्ये त्यांनी ८ दशलक्ष लीटर पाणी वाचवले आणि २.५ केडब्ल्यूएच ऊर्जा बचत केली.       ओरिफ्लेमने ६ दशलक्ष झाडे लावली असून पुनर्रोपण प्रकल्पांमध्ये त्यांचे संरक्षण केले आहे. २०२० मध्ये, त्यांचे ९९% पेपर, बोर्ड पॅकेजिंग आणि कॅटेलॉग हे विश्वसनीय प्रमाणित स्रोत किंवा पुनर्वापरातील साहित्यापासून तयार केले जाते. याद्वारे ब्रँड कार्बनचे उत्सर्जन कमी करतो, तसेच लोकांना ताज्या हवेचा श्वास घेण्यास मदत करतो.       ओरिफ्लेम त्यांच्या स्क्रब उत्पादनांसाठी १०० टक्के नैसर्गिक असे बदामाचे कवच, फळांच्या बिया, ऑलिव्ह स्टोन इत्यादी घटक वापरतो. त्यामुळे महासागरांमध्ये प्रदुषण होत नाही. याच्या लव्ह नेचर रिन्स ऑफ उत्पादने तसेच मास्कमध्ये बायो-डिग्रेडेबल फॉर्म्युलेशन्स वापरले जाते. २०१५ पासून ब्रँडने उत्पादन प्रकल्पांमध्ये प्रति युनिट ७ टक्के पाणी कपातीत यश मिळवले आहे.

ओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवी डिजिटल मोहीम ओरिफ्लेमची जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवी डिजिटल मोहीम Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि महिला पोलिसांचीही गस्त हवी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांचीही प्रत्येक ठिकाणी गस्त हवी असल्याच...

Post AD

home ads