Header AD

ओबीसी आरक्षण रद्द; महाविकास आघाडी सरकार विरोधात कल्याणात भाजपची निदर्शनेकल्याण , प्रतिनिधी  :  सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणप्रश्नी बाजू मांडण्यात कमी पडल्याचे सांगत भाजपतर्फे आज कल्याणात महाविकास आघाडी विरोधात निदर्शने करण्यात आली. माजी आमदार आणि भाजप भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली.


             ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी पडल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. आज असणाऱ्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ही निदर्शने केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

ओबीसी आरक्षण रद्द; महाविकास आघाडी सरकार विरोधात कल्याणात भाजपची निदर्शने ओबीसी आरक्षण रद्द;  महाविकास आघाडी सरकार विरोधात कल्याणात भाजपची निदर्शने Reviewed by News1 Marathi on June 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads