Header AD

भाजप व युवा वॉरियर्सचे अनाथ आश्रमात अन्नदान

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) `
अन्नदान सर्वश्रेष्ठ दान`असल्याने
भारतीय जनता युवा मोर्चा व युवा वॉरियर्स प्रभाग क्रमांक ८० - एकता नगर यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या आधार आदिवासी सेवा आश्रम या अनाथालया मध्ये मुलांना अन्नदान करण्यात आले.



यावेळी भाजपा पूर्व मंडळ शहर सचिव प्रकाश (बाळा) पवार, प्रभाग क्रमांक ८० एकता नगर वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र गवाणकर, डोंबिवली पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष मितेश पेणकर, प्रभाग क्रमांक ८० एकता नगर युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष विजय कोनार, युवा मोर्चा वॉर्ड सचिव सिद्धेश पवार, युवा मोर्चा कार्यक्रम संयोजक सुरज कनोजिया, युवा वॉरियर अध्यक्ष अथर्व खांडगे, सरचिटणीस रोहित शिरसाठ, सचिव प्रतीक पवार, उपाध्यक्ष यश खांडगे उपस्थित होते.



भाजप आणि युवा वॉरियर्स यांचे समाजकार्य पाहून आधार आदिवासी सेवा आश्रमने त्यांचे आभार मानले.कोरोना काळात असे सामाजिक उपक्रम अनाथालयात होत आहेत याबद्दल नागरिकांनीहि त्यांचे कौतुक केले.
भाजप व युवा वॉरियर्सचे अनाथ आश्रमात अन्नदान भाजप व युवा वॉरियर्सचे अनाथ आश्रमात अन्नदान Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads