Header AD

देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी ह्या विचारांतून आणीबाणी लादली - आमदार पराग अळवणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) आणीबाणी काळा दिवस निमित्त भाजप कल्याण जिल्ह्याच्या वतीने  ऑनलाइन 'संवादकार्यक्रमाचे आयोजन ककरण्यात आले होते. या सभेत विलेपार्ले येथील भाजपा आमदार पराग अळवणी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या सभेत अळवणी  यांनी आणीबाणी काळात प्रसार माध्यमांची गळचेपीलोकांवरील अत्याचारदडपशाही इ.विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.  इंदिरा सरकार विरोधात असलेला जनअक्रोशी दाबण्यासाठीस्वतःची सत्ता टिकवण्यासाठीन्यायालयापेक्षा आपण मोठे आहोतआणि देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी ह्या विचारांतून आणीबाणी लादली गेल्याचे अळवणी यांनी यावेळी सांगितले. 

           या सभेत आमदार अळवणी म्हणाले, सामाजिक संघटनांवर बंदी घातलीसाडे चार लाख लोकांना अटक करण्यात आली,न्यायालयाचे पंख छाटण्यात आले. त्यामुळे २५ जून १९७५ रोजी लादलेली आणीबाणी ही लोकशाहीसाठी काळी घटना आहे.जयप्रकाश नारायणअटलबिहारी वाजपेयीमोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणी विरोधात आंदोलनाने राष्ट्रीय स्वरूप घेतले.'सिंहासन खाली करोके जनता आ रही हैही घोषणा प्रसिध्द झाली. देशभरात विद्यार्थीयुवकमहिलाकामगार असे विविध घटक आंदोलनाच्या पवित्र्यात आले. 

       भारत देशातील लोकांचा मूळ स्वभाव हा लोकशाही मानणारा  आहे. परंतु इंदिराजींनी लोकांचा विरोध दाबून टाकायचा निर्णय घेतला.रातोरात २७ संघटनांवर बंदी घातली. विरोधी पक्षाच्या नेत्यांपासूनकार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू झाले. दीड लाख  लोकांना मीसा कायदा लावून अटक केली. तीन लाख लोकांना बीआयआर कलमान्वये अटक केली.एकूण दीड लाख लोकांनी सत्याग्रहात सहभाग घेतला. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातीलआणीबाणीत तुरुंग वास भोगलेल्या सर्वांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. 

          परंतु ठाकरे सरकारने ती योजना बंद केली, याचा आम्ही निषेध करतो.या कार्यक्रमाचे संयोजकभाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेमाजी आमदार नरेंद्र पवार,आमदार गणपत गायकवाडप्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण आणि जिल्हा कार्यालय मंत्री आशिष पावसकर,मिहीर पेणकर पवन पाटील,  पाचशे हुन अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी ह्या विचारांतून आणीबाणी लादली - आमदार पराग अळवणी देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी ह्या विचारांतून आणीबाणी लादली - आमदार पराग अळवणी   Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads