Header AD

शिवकन्या प्रतिष्ठानचे गरीब नागरिकांना कपडे वाटप व वृक्षारोपण

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना गोर गरीब, हातावर पोट असणाऱ्या जनतेचे अन्न व वस्त्र या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जिकिरीचे झाले होते. अशातच शिवकन्या प्रतिष्ठानच्या वतीने ढोलेवाडीनाशिक येथील गरीब आणि गरजू जनतेसाठी कपडे कपडे वाटप करण्यात आले.


यामध्ये लहान मुलांचे कपडेमहिलांसाठी साडी तसेच युवक वर्गासाठी शर्ट आणि पँट वाटप करण्यात आले. ढोलेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक रमेश दोंदे यांच्याकडून शाळेची माहिती घेऊन शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.


यावेळी शिवकन्या प्रतिष्ठानच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरीवाडा नगरपंचायतच्या नगरसेविका नयना चौधरीमीनल चौधरीआरंभ प्रतिष्ठान रणरागिणी कक्ष जिल्हाध्यक्षा माही चौधरीआरंभ प्रतिष्ठान तालुका प्रमुख ओंकार कोळीसंपर्कप्रमुख देवेश चौधरी, कुणाल भोईर आणि दिवेश पष्टे उपस्थित होते.

शिवकन्या प्रतिष्ठानचे गरीब नागरिकांना कपडे वाटप व वृक्षारोपण शिवकन्या प्रतिष्ठानचे गरीब नागरिकांना कपडे वाटप व वृक्षारोपण Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads