Header AD

अतिवृष्टीच्या पार्श्व भूमीवर पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाळी परिस्थितीचा आढ़ावा: ठामपाच्या आपत्कालीन कक्षाला दिली भेट
ठाणे , प्रतिनिधी  :  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने केलेल्या तयारीचा आढ़ावा घेण्यासाठी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.         यावेळी आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी आवश्यक दूरध्वनी तसेच वायरलेस सेवा सुरळीपणे चालू आहे याबाबत स्वतः यंत्रणेबाबत खातरजमा करुन घेतली. तसेच कक्षाकड़े प्राप्त होणा-या तक्रारी नोंदविल्या जात आहेत की नाही याची खातरजमा करुन पावसाळ्यात आपत्ती उद्भवल्यास त्या आपत्तीस तोंड़ देण्यासाठी महापालिका सक्षम असल्याबाबत समाधान व्यक्त केले.        महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सातत्याने नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे. शहरात नाल्याची साफसफाई पूर्णतः झाल्याने पाणी साचून कोणत्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला नाही. झाडे उन्मळून पडणे, भुस्खलन अशा कोणत्याही प्रकारची घटना घडून जीवित तसेच वित्तहानी झालेली नाही असे ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.         पाणी साठलेल्या ठिकाणी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महापालिकेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सबमर्शीबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करणे तसेच मदतीसाठी टीडीआरएफच्या तसेच एनडीआरएफ टीम तयार ठेवण्यात आल्या असून मान्सूनपूर्व महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचे विशेष आभार व्यक्त केले.        या भेटीच्या वेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपत्कालीन कक्षाद्वारे करण्यात येणा-या विविध कार्यवाहींबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष सुयोग्यप्रकारे पावसाळा हाताळेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री - १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन - ०२२ २५३७१०१० या  क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीच्या पार्श्व भूमीवर पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाळी परिस्थितीचा आढ़ावा: ठामपाच्या आपत्कालीन कक्षाला दिली भेट अतिवृष्टीच्या पार्श्व भूमीवर पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतला पावसाळी परिस्थितीचा आढ़ावा: ठामपाच्या आपत्कालीन कक्षाला दिली भेट Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads