Header AD

शिवसेनेच्या पुढाकाराने विद्या पाटील यांच्या मुलीला मिळणार मोफत शिक्षण..
डोंबिवली ( शंकर जाधव ) ३० मे रोजी डोंबिवलीतील विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे गाडीखाली पडून मृत्यू झाला.पाटील यांची घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता.पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना पुढे आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेतर्फे शिवसेना शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मॉडेल शाळा आणि कॉलेजचे व्यवस्थापक बांबर्डे ह्यांची भेट घेऊन घेतली.   पाटील यांची  मुलगी  ज्या मॉडेल शाळेत शिकत आहेतत्यांच्या घरात कमावते कोणी नसल्यामुळे व्यवस्थापनाने त्यांचे शालेय व पुढे महाविद्यालयीन पदवी पर्यंतचे शिक्षणाची फी माफ करावी अशी विनंती शिवसैनिकांनी केली. या कोरोना महामारीत शाळेने व कॉलेजने फी भरण्याकरिता विद्यार्थी व पालकांना कोठेही दबाव न आणता त्यांना फी मध्ये सवलत देवून ती टप्या टप्यात जमा करावी तसेच ज्याची सध्या परिस्थिती अत्यंत बिकट आहे अश्या विद्यार्थ्यांना जमल्यास फी माफ करावी अशीही विनंती करण्यात आली.      त्यावेळी  बांबर्दे साहेब ह्यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद ददेत आम्ही नक्कीच योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही दिली.या शिष्टमंडळात शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे,कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंडमहिला शहरासंघटक मंगला सुळे, किरण मोंडकरउपशहरप्रमुख संतोष चव्हाणकिशोर मानकामेमाजी परिवहन सभापती सुधीर पाटीलकार्यालयप्रमुख सतीश मोडकउपशहरसंघटक संजय पावशे आदी सामील होते.

शिवसेनेच्या पुढाकाराने विद्या पाटील यांच्या मुलीला मिळणार मोफत शिक्षण.. शिवसेनेच्या पुढाकाराने विद्या पाटील यांच्या मुलीला मिळणार मोफत शिक्षण..   Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads