Header AD

शहर सौंदर्यी करणांतर्गत ठाण्यातील भिंती, चौक, सेवा रस्ते झाले बोलके विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंग रंगोटी

 ठाणे, दि ६ :  ठाण्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख भिंती, चौक, रस्ते दुभाजक, गार्डन्स तसेच फ्लायओव्हरवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाशित होवून शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सौंदर्यीकरणांतर्गत प्रमुख ठिकाणी विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. 
           बऱ्याच वेळा पानाच्या पिचकाऱ्या मारून शहरातील भिंतींचे विद्रुपिकरण झालेले नजरेस येते. परंतु याच भिंतीच्या माध्यमातून तसेच फ्लायओव्हर, गार्डन्स आदी ठिकाणी रंगरंगोटी करून शहर सुंदर बनवण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहराच्या भिंती सुंदर दिसाव्यात, इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांना शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख पटावी या उद्देशाने सर्व भिंतीं, विविध चौक, सेवा रस्ते आदी ठिकाणी विविध संकल्पनेवर आधारित वेगवेगळी चित्रे रेखाटण्यात येत आहेत.            शहराच्या सौंदर्यात ही चित्रे अधिकच भर घालत असून शहरातील सर्व भिंती सजीव होऊ लागल्या आहेत. भिंतीवरील मनमोहक चित्रांनी सध्या ठाण्याचे रुप बदलत  आहे. रस्त्यांवरच्या भिंतीं,  फ्लायओव्हर, गार्डन्स, इमारतींच्या भिंतीं रस्ता दुभाजकावर सध्या वास्तववादी जगणे रेखाटलेले पाहायला मिळते. मानवी हावभाव, पक्षी-प्राणी,झाडे तसेच विविध संकल्पनावर आधारित चित्रकारी हल्ली ठाण्यात आकर्षणाचे केद्रबिंदू ठरत आहे.  या सजीव भिंती सेल्फी पाँइट होवू लागल्या असून विविध सामाजिक संदेशाच्या माध्यमातून या भिंतीही संवाद साधू लागल्या आहेत.

      

              आज महापालिका उप आयुक्त संदीप माळवी यांनी महापालिकेच्यावतीने शहर सौंदर्यीकरणांतर्गत कोपरी, कॅडबरी जंक्शन, आनंदनगर, आनंदनगर जकात नाका तसेच बारा बंगला येथील रंगरंगोटीसह सुरू असलेल्या इतर सुशोभिकरण कामाची पाहणी केली. 

शहर सौंदर्यी करणांतर्गत ठाण्यातील भिंती, चौक, सेवा रस्ते झाले बोलके विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंग रंगोटी शहर सौंदर्यी करणांतर्गत ठाण्यातील भिंती, चौक, सेवा रस्ते झाले बोलके विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंग रंगोटी Reviewed by News1 Marathi on June 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads