Header AD

वाहतूक पोलिसांच्या वतीने गोरगरिबांना अन्नदान

 

■गोरगरिबांच्या मदतीसाठी वाहतूक पोलीस आणि सामाजिक संघटना आल्या धावून...


कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयशहर वाहतूक उपशाखा कल्याणस्वामी नारायण हॉलकच्छ युवक संघ अंतर्गत कल्याण स्टेशन परिसारत गोरगरिबांना मोफत अन्न वाटप करण्यात आले.


कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत अन्न वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत वहातुक शहर उपशाखा कल्याण व स्वामी नारायण हॉलकच्छ युवक संघ यांच्या तर्फे सकाळी व संध्याकाळी दोन टाईम अन्न वाटप करण्यात येईल.


यावेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक कल्याण सुखदेव पाटील,  सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील उपस्थित होते.

वाहतूक पोलिसांच्या वतीने गोरगरिबांना अन्नदान वाहतूक पोलिसांच्या वतीने गोरगरिबांना अन्नदान Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads