Header AD

मुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने  अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठणा-या आणि कामावर जाणा- या चाकरमान्यांचे हाल झाले.अत्यावश्यक सेवा व इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना फलाटांवर ताटकळत थांबावे लागले. पावसाचा जोर नसताना लोकल गाड्यांतून ज्या  प्रवाशांनी प्रवास सुरु केला. त्यांना लोकल मध्ये दुपारपर्यंत बसावे लागले.           छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून निघालेल्या अप  लोकलंना पाणी तुंबल्यामुळे दादर - कुर्ला स्थानकादरम्यान प्रवास थांबवावा लागला.तर कर्जत- कसारा , टिटवाळा लोकल पैकी कित्येक लोकल रद्द कराव्या लागल्या. या लोकल ठाकुर्ली कारशेड येथे वळविण्यात आल्या.  डोंबिवली येथील रेल्वे कर्मचाऱ्यांना ठाकुर्ली स्थानकात मदतीला जावे लागल्याची  माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.लोकल गाड्या बंद झाल्याने वाहतुकीचा भार रस्त्यावरच्या प्रवासावर आला.          कल्याण शिळफाट्यावर  दुपार पर्यंत वाहतूकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.विद्याविहार आणि कुर्ला स्थानकात थांबलेल्या लोकलमधील प्रवाशांना रेल्वे रुळावरुन विद्याविहार  स्थानकात जाण्यासाठी लोकलमधून खाली उतरण्यासाठी पोलीस मदत करत असल्याची माहिती डोंबिवलीकर चाकरमान्यांनी दिली.
मुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल मुसळधार पावसाने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे हाल Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads