Header AD

म्हस्कळ जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले सभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा म्हसकळ या शाळेच्या व्हरांड्याचे छत नुकतेच कोसळले. सुदैवाने शाळा बंद असल्याने कोणतीही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच  कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचोरे व गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी शाळेचा पाहणी दौरा केला. दुरूस्ती बाबत शाळेच्या मुख्याध्यपकांना सूचना दिल्या.    



             कल्याण तालुक्यातील म्हसकळ येथील जिल्हा परिषदेची शाळेच्या इमारती समाज विकास योजनेतून १९५४ आणि दुसरी १९७६ मध्ये बांधण्यात आली होती. इयत्ता १ ते ७ पर्यत ही शाळा आहे. येथे एकूण ६ वर्ग खोल्या असून  त्यापैकी ४ वर्ग खोल्या या धोकादायक झाल्या आहेत. 



           गेल्या दिड वर्षापासून कोरोना काळात शाळा बंद आहेत. सदर धोकादायक वर्ग खोल्या पाडण्याचे प्रस्ताव देखील पाठविण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून कल्याण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्याने गुरुवारी  १९७६ मध्ये बांधलेल्या शाळेचा काही भाग कोसळला.  शाळा बंद असल्याने कोणतीही हानी झाली नाही.  


                               
           शुक्रवारी गोवेली येथील समाजकल्याण विभागाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे आणि गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी या शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यपकांना शाळेचा प्रस्ताव पाठविण्याठी सूचना केल्या आहेत.
म्हस्कळ जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले सभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी म्हस्कळ जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले सभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads