Header AD

तृतीय पंथीयासाठीचे राज्यातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु

 

किन्नर अस्मितेच्या संस्थापिका नीता केणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  रस्त्यात लोकलमध्ये मंगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक समजल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयासाठी केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु करण्यात आले आहे. कल्याण मलंग गड रोड वरील तमन्ना रेसिडन्सी या इमारती मधील तिसर्‍या आणि चौथ्या माळ्यावरील या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.


किन्नरासाठी मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या किन्नर अस्मिता संस्थेकडून हे केंद्र चालविले जाणार आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या संस्थापिका नीता केणे यांनी याबाबत बोलताना आजपर्यत समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. या समाजातील किन्नरांना उदर निर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना भिक मागावी लागते. नृत्य करून इतरांचे मनोरंजन करावे लागते किंवा शरीर विक्रय व्यवसाय करावा लागतो. त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवारा केंद्राची संकल्पना राबविली आहे.


 या केंद्रात केवळ राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार नसून समाजातील किन्नराना शिक्षणाबरोबरच रोजगारासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. इतर राज्यात किन्नरांना शिक्षणासाठी रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून पेन्शन दिली जाते मात्र महाराष्ट्रात हा समाज उपेक्षित राहिला असून सरकारने इतरा प्रमाणेच किन्नरांना देखील सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी नीता केणे यांनी त्यांनी केली आहे.


तर किन्नरांसाठी सुरु करण्यात आलेल्या गरिमा होमच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयानी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारच्या निवासाची व्यवस्था झाल्याबद्दल त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. 

तृतीय पंथीयासाठीचे राज्यातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु तृतीय पंथीयासाठीचे राज्यातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु Reviewed by News1 Marathi on June 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads