Header AD

वटपौर्णिमाच्या दिवशी नवऱ्याच्या त्रासातून सावित्रीची सुटका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मध्यस्तीने झाली सुटका

 कल्याण , कुणाल  म्हात्रे : वटपौर्णिमाच्या दिवशी नवराच्या मानसिक त्रासाला कटाळलेल्या सावित्रीची बल्याणी येथुन शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने सुटका करीत वडील व भाऊ यांच्या ताब्यात दिले आहे.बल्याणी परिसरातील माताजी मंदिर टेकडी परिसरात चाळीत राहणाऱ्या जमशेद गनी हा आपली पत्नी शगुप्ता व २० माहिनांच्या चिमुकली सह राहत असुन तो बेरोजगार होता. जमशेद गनी हा घराबाहेर जाताना आपल्या पत्नीस घराच्या दरावाजाला कुलुप लावुन पत्नी व मुलीस कोडुन निघून जात तिला मानसिक त्रास देत होता. याबाबत गोरेगाव येथे राहणारे तिचे वडील व  भाऊ यांनी उघोग मंत्री सुभाष देसाई यांच्या कानावर हा प्रकार सांगितला असता उघोग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला.शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेना उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांना श गुप्ता हिस मदत करून नवऱ्याचा मानसिक त्रासातून सुटका करावी असे सांगितले. किशोर शुक्ला यांनी युवासेना पदाधिकारी जयेश वाणी, शिवसेना पदाधिकारी दादा किस्मतरावसंतोष पवार यांनी टिटवाळा पोलीसच्या सह शगुप्ता यांचे घर शोधुन कुलुपबंद असलेल्या चाळीतील घरातुन घराचे टाळे तोडुन शगुप्ता व तिच्या चिमुकलीची सुटक  केली.शगुफ्ताचा शोध घेऊन खरी परिसिस्थिती माहित झाल्यावर टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजु वंजारी यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. वंजारी यांनीही प्रशासनाची चाकं वेगाने फिरवून पोलिस हवालदार संदिप मुंडेपो. ह. शरद आव्हाडमहिला पो. ह. ज्योत्स्ना पडवळ यांची एक टिम या महिलेच्या आणि तीच्या लहान बाळाच्या सुटकेसाठी पाठवली. घाराचं कुलूप तोडून पोलिस आणि शिवसैनिकांनी या महिलेची आणि तीच्या बाळाची सुटका केली. झाल्या प्रकारानंतर पिडीत महिलेने शिवसेना आणि शिवसैनिकांचे आभार मानलेत. मी मुस्लिम असुनही आज मला माझ्या शिवसेनेच्या भावांनी मदत केल्याची भावना तीने व्यक्त केली. वटपौर्णिमेला एका सावित्रीची पतीच्या जाचातुन मुक्तता करण्यात येऊन तीच्या इच्छेनुसार तीला तीच्या आई - वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं.

वटपौर्णिमाच्या दिवशी नवऱ्याच्या त्रासातून सावित्रीची सुटका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मध्यस्तीने झाली सुटका वटपौर्णिमाच्या दिवशी नवऱ्याच्या त्रासातून सावित्रीची सुटका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मध्यस्तीने झाली सुटका Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads