Header AD

१९५निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : कोरोना महामारीच्या कालावधीत संत निरंकारी मिशन मार्फत चालविण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेमध्ये मागील लागोपाठ दोन रविवारी दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये १९५ निरंकारी भक्तांनी निष्काम मानवसेवेच्या भावनेने मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.          यापैकी पहिले शिबिर २० जून रोजी कोंकण नगरभांडूप (पश्चिम) येथील गणेश नगरात आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ११० युनिट रक्तदान केले गेले. तसेच दूसरे शिबिर संत निरंकारी सत्संग भवनपश्चिम एक्सप्रेस हायवेजवळसांताक्रुझ येथे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये ८५ युनिट रक्त संकलित झाले. दोन्ही शिबिरांमध्ये रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीकडून करण्यात आले.      भांडूप येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर विलेपार्ले येथील शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुशील धानुका यांनी केले. दोन्ही शिबिरांचे यशस्वी आयोजन मंडळाचे स्थानीय सेक्टर संयोजक आणि मुखी यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने केले. 

१९५निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान १९५निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads