Header AD

स्पॉट गोल्डच्या दरात ०.५ टक्क्यांची वृद्धी

 मुंबई, ११ जून २०२१ : एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की कालच्या ट्रेडिंग सत्रात, स्पॉट गोल्ड ०.५ टक्के वाढून १८९८ डॉलर प्रति औंसवर बंद झाले, कारण चलनवाढीच्या वाढत्या चिंतेने गुंतवणूकदारांचा मोहरा सोन्याकडे वळवला, ज्याकडे चलनवाढीपासून बचाव म्हणून पाहिले जाते.            यूएस कन्झ्युमर किंमती अर्थव्यवस्था पुन्हा सुरू केल्यानंतर मे' २१ मध्ये वाढल्या, ज्यामुळे मागणीत वाढ झाली. अमेरिकनांच्या नवीन बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये घट आली आहे, जो एका मजबूत लेबर मार्केटचा संकेत आहे. मात्र अमेरिकेच्या फेडरल रिझर्व अधिकार्‍यांनी अगोदर सांगितले होते की, किंमतींमधली ही वाढ अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाल्याच्या प्रारंभिक आशावादानंतर अस्थायी आहे.          अमेरिकेचे चलन उत्साही आर्थिक आकड्यांच्या शृंखलेमुळे मजबूत झाले, त्यातून बाजाराच्या मूडला आधार मिळाला, त्यामुळे डॉलरचे मूल्य असलेले सोने त्यांच्या चलन धारकांसाठी कमी वांछनीय झाले. कमोडिटीच्या उंच किंमतींच्यानंतर चीनच्या फॅक्टरी गेटच्या किंमतीत तेजीनंतर सोन्याच्या किंमतींना थोडे समर्थन मिळाले आणि चलनवाढीची चिंता आणखीन वाढली.

स्पॉट गोल्डच्या दरात ०.५ टक्क्यांची वृद्धी स्पॉट गोल्डच्या दरात ०.५ टक्क्यांची वृद्धी Reviewed by News1 Marathi on June 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads