Header AD

रस्त्यांवरील डेब्रीज उचला ; तुटलेले कफस्टोन, फुटपाथ तात्काळ दुरूस्त करा महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

 

■शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामांची पाहणी करताना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा सोबत इतर महापालिका अधिकारी...



ठाणे , प्रतिनिधी  ; महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज पायी चालतच शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करून रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याचे आदेश देतानाच तुटलेले कफस्टोन तसेच फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  


            आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी तीन हात नाका येथून चालतच सुशोभीकरण, खड्डे भरणे, फुटपाथ दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन हात नाका, आयकर कार्यालय, राजदीप सोसायटी, मल्हार सिनेमा गोखले रोड, नौपाडा मुख्य मार्केट तसेच मासुंदा तलाव आदी ठिकाणांच्या रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी केली.



         शहरातील प्रमुख रस्त्यावरील डेब्रीज तात्काळ उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून तुटलेले कफस्टोन व फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  



         दरम्यान शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


 

         यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, चेतन पटेल, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.   


रस्त्यांवरील डेब्रीज उचला ; तुटलेले कफस्टोन, फुटपाथ तात्काळ दुरूस्त करा महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश रस्त्यांवरील डेब्रीज उचला ; तुटलेले कफस्टोन, फुटपाथ तात्काळ दुरूस्त करा महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads