Header AD

पदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेटमुंबई दि.8 :-  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मागासवर्गीय आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची आज पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे  मुंबई प्रदेश मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्रालय येथे भेट घेतली.  शासकीय नोकरीतील पदोन्नती मधील आरक्षण त्वरित लागू करा असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. अजितदादा पवार यांनी यासंदर्भात उपसमिती मधील सदस्यां सोबत बैठका झाल्या आहेत. कायदेशीर सल्ला मागविण्यात आला आहे. तसेच या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ही चर्चा करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.           केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपाइं तर्फे दि. 1 जून ते 7 जून राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. त्यानुसार  रिपाइं चे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर आंदोलन करण्याचा ईशारा देऊन तशी तयारी केली होती. त्याची बातमी पोलिसांना लागल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत आंदोलक नेते रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील रिपाइं च्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट मंत्रालय येथे घडवून दिली.         या भेटीत झालेल्या चर्चेत पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणारा शासन निर्णय राज्य सरकार ने काढल्यामुळे मागासवर्गीयां वर अन्याय झाल्याचे सांगत ह निर्णय त्वरित रद्द करून पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकार ने त्वरित घ्यावी अशी  मागणी रमेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी रिपाइं च्या शिष्टमंडळात सचिन आठवले;अभिजित गायकवाड; विशाल गाडे; सुरेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट पदोन्नती मधील आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी घेतली भेट Reviewed by News1 Marathi on June 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads