Header AD

डोंबिवलीकर तरुणाने साकारले अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे थ्रीडी स्मृतीस्थळ

 

■थॉमस जेफरसन यांच्या स्मृतिदिना निमित्त वाहिली अनोखी श्रद्धांजली...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांचा ४ जुलै रोजी स्मृतीदिन असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोबिंवलीतील शुभम निकम या तरुणाने त्यांचे स्मृतीस्थळ थ्रीडीमध्ये साकारले आहे. याआधी शुभमने शिवरायांची शिवजन्मभुमी थ्रीडी  मध्ये बनवली होती.           शुभंम निकम हा सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग शिकत असून त्याला आर्किटेक्चरचीही आवड आहे. अमेरिकेचे तिसरे राष्ट्रपती थॉमस जेफरसन हे स्वतः देखील आर्किटेक्चर होते. त्याचप्रमाणे अनेक कौशल्ये त्यांच्यात होती. अमैरिकेच्या मुळ रहिवाशांना हाक्क मिळावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर खुप कष्ट घेतले. ब्रिटिशांपासुन अमेरिका वेगळी होवुन संयुक्त आमेरिका व्हावीअमेरिका देशात लोकांचे राज्य अर्थात लोकशाही यावी व अमेरिका प्रजासत्ताक देश व्हावा यासाठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे.थॉमस जेफरसन यांचा जन्म १ एप्रिल १७४३ साली तर मृत्यू ४ जुलै १८२६ रोजी झाला. वॉशिंग्टनमध्ये त्यांचे स्मृतीस्थळ आहे. दरवर्षी 4 जुलै रोजी नागरिक त्यांना श्रध्दांजली अर्पण करतात. थॉमस जेफरसन हे राष्ट्रपती या व्यतिरिक्त स्वतः ही एक आर्किटेक्चर होते सोबतच ते वकिलगायक व तत्वज्ञानीही होते. अमेरिकेचे उपाध्यक्ष होण्यापुर्वी त्यांनी जॉन अडम्सच्या अंतर्गत अमेरिकेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणुनही काम केले होतेअमेरिकेच्या ्वातंत्र्य घोषणेचे ते मुख्य लेखक होते सोबत प्रजासत्ताक व अमेरिकन लोकांना वैयक्तिक हक्क मिळावेत याचे त्यांनी समर्थन केले होते.    अशा या थोर व्यक्तिमत्वाला वंदन करण्यासाठी त्यांचे स्मृतीस्थळ थ्रीडीमध्ये बनवले असून, यापुढे रायगड किल्ला आणि कोल्हापूरचा शाहू पॅलेस थ्रीडी मध्ये साकारणार असल्याचे शुभम निकम याने सांगितले.  
डोंबिवलीकर तरुणाने साकारले अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे थ्रीडी स्मृतीस्थळ डोंबिवलीकर तरुणाने साकारले अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे थ्रीडी स्मृतीस्थळ   Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads