Header AD

भिवंडी रिंगरोड एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करायला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी


■७किमीच्या रिंगरोड मुळे भिवंडी शहरातील ट्रॅफिकची समस्या सुटण्यास होणार मदत...

  

मुंबई , प्रतिनिधी  :-  भिवंडी शहराला बायपास करून अंजूर फाट्याला जोडणाऱ्या रिंग रोडचं काम एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करायला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंजुरी दिली. त्यामुळे भिवंडी शहराची ट्रॅफिक कोंडीतून मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


    भिवंडी जवळच्या चाविडा गावापासून ते पोगाव- टेमघर- कामतघर-फेणामार्गे अंजूरफाट्याचा जोडणारा सात किलोमीटर लांबीच्या रिंग रोडला आज नगरविकास मंत्र्यांनी मंजुरी दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या भागात होणाऱ्या वाहतुक कोंडितून नागरिकांची मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीए आयुक्तांना दिले.


             

                या रिंग रोडसाठी लागणारा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून देण्यात येणार असून,  या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचे आणि भूसंपादनाचे काम भिवंडी महानगरपालिेकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसात याबाबत एकत्रित बैठक घेऊन या रिंग रोडचे काम सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.           भिवंडी शहरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा रिंग रोड होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या रिंग रोडमुळे फक्त भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सुटणार नसून, समृद्धी महामार्ग सुरू झाल्यावर भिवंडीत जाण्यासाठी एक समांतर अंतर्गत रस्ता देखील वाहनचालकांसाठी तयार होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठीही त्याची मदत होईल, त्यामुळे तो वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचं श्री. शिंदे यांनी यावेळी  स्पष्ट केलं.              आज झालेल्या या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.एस. श्रीनिवास, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज आशिया, पोलिस उपायुक्त (वाहतूक) बाळासाहेब पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी रिंगरोड एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करायला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी भिवंडी रिंगरोड एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्ण करायला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads