Header AD

भिवंडीत उड्डाणं पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांचे जीव धोक्यात






भिवंडी दि 22(प्रतिनिधी ) भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्व.राजीव गांधी उड्डाणं पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. स्व राजीव गांधी उड्डाणपूल हा सुरवाती पासून नादुरुस्त असल्याने याच्या डागडुजीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे .



          
           तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने तो अवजड वाहनांसाठी बंद केला असून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी शासना कडून सुमारे 7 कोटी रुपये  मंजूर झाल्यावर येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीस सुरवात झाली परंतु फक्त धामणकर नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे दुरुस्ती पूर्ण झाली व त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित भागातील दुरुस्ती रखडली असून या उड्डाणपुलावार मोठं मोठाले  खोल खड्डे पडल्याने  या उड्डाण पुलावरून येजा करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांची ये जा करणारे वाहनचालक मेटाकुटीला आले असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात या पुलावर होत आहेत.



            तर खड्ड्यात आपटून वाहने नादुरुस्त होत  असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत.त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे.  मात्र याकडे  महानगर पालिकेचे  दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून रोड दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भिवंडीत उड्डाणं पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांचे जीव धोक्यात भिवंडीत उड्डाणं पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांचे जीव धोक्यात Reviewed by News1 Marathi on June 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads