Header AD

नानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा





ठाणे, प्रतिनिधी  ;  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेब यांचा वाढदिवस ठाणे शहरामध्ये विविध उपक्रमांद्वारे साजरा केला गेला.ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही मिठबंदर रोड ठाणे,पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


             महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनाने व ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक ,ठाणे इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे ब्लॉक अध्यक्ष निलेश अहिरे, प्रवक्ते गिरीश कोळी,  रवी कोळी ,स्वप्नील कोळी,मधुकर पाटील, शिवाजी पिंगळे,मनीषा कदम,योगेश मयेकर आदी शहर पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी राहुल पिंगळे यांनी सर्वांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.या कोवीड -19 च्या कालावधीत आपण पाहिले की वेळप्रसंगी आँक्सीजन ची किती गरज भासली .आपल्याला हे नैसर्गिक आँक्सीजन झाडांच्या माध्यमातून मिळत असतो. झाड असेल तिथे समृद्धी व चैतन्य असते तिथले वातावरण हे उत्साहवर्धक असते.आपणही त्याचे संगोपन करुन त्याची निगा राखली पाहिजे असे बोलताना त्यानी याप्रसंगी सांगितले
नानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा नानभाऊ पटोले यांचा वाढदिवस पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्य मातून वृक्षारोपण करून साजरा Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads