Header AD

परीक्षा देऊनही गैरहजर दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?


■विद्यार्थी भारतीने घेतली मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख - विनोद पाटील यांची भेट...


कल्याण, कुणाल  म्हात्रे   :  विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर दाखविले आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.  अश्या काही विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे आली अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.   विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांची भेट घेत संबंधित विषयावर चर्चा केली व पत्रव्यवहार करत  विद्यार्थ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं असे आव्हान विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा जया गणाई यांनी केले.    परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांनी तक्रार आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे डिटेल्स मागवून त्या महाविद्यालयातील जबाबदार पदाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी दिली.          विद्यापीठा  संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांशी खालील नंबरवर संपर्क करा असे आवाहन विद्यार्थी भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

9321638034

8097834167

8104571787


परीक्षा देऊनही गैरहजर दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण? परीक्षा देऊनही गैरहजर दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाली कोण? Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads