Header AD

भिवंडीतील जवाद हमिद चिखलेकर यांची सरपंच सेवा महासंघाच्या ठाणे जिल्हा आध्यक्ष पदी नियुक्ती

 भिवंडी दि 16 (प्रतिनिधी)  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील राहुर ग्रामपंचाय येथील माजी सरपंच जवाद हमिद चिखलेकर  यांची  सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या ठाणे जिल्हा आध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी  महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे.  आज पर्यंत राज्य कार्यकारिणी ने  शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.           भिवंडी तालुक्यातील राहुर ग्रामपंचायत पंचायत माजी सरपंच त्यांच्या कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी कोअर कमिटी च्या निर्णयानुसार राज्य कार्यकारिणी च्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल मारोतराव उके, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन जिल्हाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली .               ते आपल्या नियुक्ती चे श्रेय सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, मानद अध्यक्ष चंद्रकांत बंधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभिरे, उपाध्यक्ष बाळासाहेब मस्के, सचिव सुनील राहाटे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, संघटक अन्नासाहेब जाधव, सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य कार्यकारिणी सदस्य सतीश साखरे, सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे,प्रविन शहाने अयुबखान पठाण यांना देत आहे .चिखलेकर त्यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव   होत आहे.
भिवंडीतील जवाद हमिद चिखलेकर यांची सरपंच सेवा महासंघाच्या ठाणे जिल्हा आध्यक्ष पदी नियुक्ती भिवंडीतील जवाद हमिद चिखलेकर यांची सरपंच सेवा महासंघाच्या ठाणे  जिल्हा आध्यक्ष पदी नियुक्ती Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads