Header AD

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती

 

■ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती झालेबद्दल अभिनंदन करताना महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा सोबत उप महापौर सौ.पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेता अशोक वैती, विरोधी पक्षनेता, अशरफ शानु पठाण, शिवसेना गटनेता दिलीप बारटक्के, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक नरेश मणेरा, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी आदी.                                             


ठाणे , प्रतिनिधि  ;   ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आज नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत. महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.


     

      अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांचे शिक्षण कोल्हापूर या त्यांच्या मूळ गावी झाले असून त्यांनी एमबीए, एलएलबी, बीजेसी, नागरी व्यवस्थापनामध्ये पदविका आणि बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे.      अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी 12 वर्षे पत्रकारिता मध्ये काम केले आहे. श्री. माळवी यांनी २००२ साली शासकीय सेवेला सुरूवात केली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेत सह संचालक माहिती शिक्षण व संपर्क म्हणून काम केले.            सन 2005 साली ते ठाणे महापालिका मध्ये मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून रूजू झाले. गेली 6 वर्षे ते उप आयुक्त पदावर कार्यरत असून आज राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने त्यांची ठाणे महापालिलेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.     एक उत्तम प्रशासकीय अधिकारी यासोबत ते उत्तम कवी, गझलकार, गीतकार, लेखक म्हणून परिचित आहेत. संदीप माळवी यांना त्याच्या प्रशासकीय सेवेत तील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच त्याच्या लेखनाचा अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads