Header AD

भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर न दाखविणे हा ट्विटर चा गंभीर अपराध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले




मुंबई दि. 30  :  जम्मू काश्मीर ह भारताचे अविभाज्य अंग आहे. भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर न दाखविण्याचा गंभीर  अपराध ट्विटर ने केला आहे.भारतात काम करताना ट्विटर भारताच्या भावना दुखविता कामा नये तसेच केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक करण्याची   ट्विटर ने केलेली कारवाई निषेधार्ह आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक  न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 



              महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या पाठिंब्याने शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार मध्ये अंतर्गत मोठे वाद आणि संशयाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस कधी या सरकार चा पाठिंबा काढेल सांगता येत नाही.किंवा शिवसेना सुद्धा स्वतःहून महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडू शकते अशी स्थिती आहे.



             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत.उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी चा पुनर्विचार करून भविष्याचा दूरदृष्टीने  विचार करून भाजप सोबत युती केली पाहिजे.अडीज वर्षे भाजप आणि अडीज वर्षे शिवसेना असे  मुख्यमंत्री पदाचे वाटप करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर न दाखविणे हा ट्विटर चा गंभीर अपराध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर न दाखविणे हा ट्विटर चा  गंभीर अपराध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads