Header AD

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले


पर्यावरण दिनी रिपाइं च्या पर्यावरण आघाडी ची स्थापना..


मुंबई दि. 5 : - कोरोना च्या वर्षभराच्या काळात प्राणवायू ऑक्सिजन ची किती गरज आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे. प्राणवायू देणारी वृक्षवल्ली आपण वाचविली पाहिजे.  निसर्ग पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.संवर्धन केले पाहिजे.त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा निळा भगवा झाडे जगवा असे आवाहन आज जागतिक पर्यावरण दिनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. 


■अलियावर जंग इन्स्टिट्यूट बांद्रा पश्चिम येथे ना. रामदास आठवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


           तसेच त्यापूर्वी सकाळी नवी मुंबई मधील महापे येथील राम फॅशन कंपनी आवारात  ना रामदास आठवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले  आणि  हॉटेल फॉर्च्युन वाशी येथे  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रिपब्लिकन  पक्षाच्या पर्यावरण आघाडी ची स्थापना करण्यात आली. त्याच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी विजय ढमाले ; महाराष्ट्र अध्यक्ष पदी अशोक गायकवाड; मुंबई अध्यक्ष पदी विजय शेट्टी; नवी मुंबई अध्यक्ष पदी  यशपाल ओव्हाळ; आदींची नियुक्ती करण्यात आली. 


         झाडे नुसती लावू नका तर ती झाडे जगविण्याकडे लक्ष द्या. पर्यावरण वाचविण्यासाठी दक्ष राहा; निसर्गाचे मित्र व्हा ; शहरांमध्ये वृक्षसंपदा टिकवा ; आपल्या परिसरात झाडे लावा .प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. 

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads