Header AD

अबब... डोंबिवलीत एका बंगल्यात ११ नाग

 डोंबिवली (  शंकर जाधव)   डोंबिवली पूर्वेकडील शिवम हॉस्पिटलच्या मागील  आशीर्वाद  बंगला नं.११ मध्ये  मध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांना एकाच बंगल्यात ११  नाग आढळून आले. पॉज हेल्पलाईन ला गेल्या रविवारी आलेल्या कॉल नुसार 1 मादा कोब्रा आढळून आली होती. तिला निसर्गात सुखरूप पुनर्वसन केले गेले. आणि त्याच बंगल्याचा आवारात काल चक्क ११ कोब्रा म्हणजे नाग वावरताना आढळून आले. 
          पॉजचे स्वयंसेवक ऋषी सुरसे ह्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत एक एक करत नाग पकडायला सुरुवात केली. तासाभरातच सुमारे ११ नागांची पिल्ले बंगल्यात मिळाली. ही सर्व पिल्ले  साधारण एक आठवड्याची असून ती पिल्ले एकाच मादी ची असावीत आणि गेल्या आठवड्यात ज्या मादि नागाला पुनरवसीत केले तिनेच ह्यां पिल्लांची अंडी घातली असण्याची शक्यता आहे असे संस्थेचे संचालक निलेश भणगे ह्यांनी सांगितले. 
         एकाच वेळी विषारी नाग आढळून आल्यामुळे  नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती आणि त्यातच सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून ११  कोब्रा पिल्ले पकडून त्यांना सुखरूप पणे डोंबिवली जवळच्या जंगलात  पुनर्वसित केले.  नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे.          
          डोंबिवली मध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात नाग आढळून येतो. पॉज ने गेल्या २१  वर्षात ६०० च्या वर नागांचे पुनर्वसन केले आहे. आठवड्याभरात  डोंबिवली मधून १५  विविध सर्पांची सुटका केली असून  १ घोरपड देखील पुनर्वसित केले आहे.
अबब... डोंबिवलीत एका बंगल्यात ११ नाग अबब... डोंबिवलीत एका बंगल्यात ११  नाग Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads