Header AD

महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक प्रल्हाद होगे पाटील सेवा निवृत्त, महापौर यांनी केला गौरव
भिवंडी, प्रतिनिधी  ;  भिवंडी महानगरपालिकेत सध्या सहाय्यक संचालक नगररचना पदावर  कार्यरत असलेले प्रल्हाद होगेपाटील 31 वर्षांच्या शासकीय सेवेनंतर आज 30 जून रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीप्रित्यर्थ महापौर दालनात एका छोट्या खानी निरोप समारंभाचे आयोजन महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.         त्यावेळेला महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी प्रल्हाद  होगेपाटील यांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र  देऊन तर चंदाताई पाटील यांचा  शाल, साडी, देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळेला कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर. पाटील, महापालिका मुख्यालय उपायुक्त योगेश गोडसे, आरोग्य विभाग उपायुक्त  दीपक झींजाड, अंतर्गत लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे,  नगररचनाकार श्रीकांत देव, मुख्य वैद्यकीय अधिकारी  कारभारी खरात, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, नगररचना विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.        प्रल्हाद होगेपाटील यांनी त्यांच्या काळात. महापालिकेत चांगली सेवा केली, त्यांनी फार चांगल्या प्रकारे विकास शुल्क वसूल केले, शहराच्या विकास कामात रस्ता रुंदीकरण कामात त्यांनी चांगले काम केलं, असे गोरवउद्गार  महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढले, तर सत्काराला उत्तर देताना होगे पाटील म्हणाले की, शासकीय सेवेत सामान्य नागरिक यांची कामे करण्यात आनंद आहे, सामान्य नागरिक यांच्या समस्या समजावून घ्या त्यांच्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करा, नगररचना विभाग शहराचा प्रमुख भाग आहे, अनेक विकास योजना , नवीन प्रकल्प आपल्याला उभे करता येतात, त्याच्यात आनंद आहे.        आपल्या कामात आनंद शोधा असे होगे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. होगेपाटील यांनी त्यांच्या सेवा काळात  विविध ठिकाणी काम केली, तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात त्यांनी विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले, त्या नंतर उल्हास नगर, अंबरनाथ, भिवंडी येथे नगर रचनाकार , सहायक संचालक म्हणून काम केलं.

महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक प्रल्हाद होगे पाटील सेवा निवृत्त, महापौर यांनी केला गौरव महानगरपालिकेचे सहाय्यक संचालक प्रल्हाद होगे पाटील सेवा निवृत्त, महापौर यांनी केला गौरव Reviewed by News1 Marathi on June 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads