Header AD

ठाणकर पाडा परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार

 

■नगरसेवक मोहन उगले यांनी वेधले पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत असून याबाबत नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून आज या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करत नागरिकांची पाण्याची समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले.       सध्या सर्वत्र पावसाळा सुरु असला तरी कल्याण मधील ठाणकर पाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या लाईनला प्रेशर नसणे, नियमित पाणीपुरवठा न होणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी याबाबत नगरसेवक मोहन उगले यांना माहिती दिली. उगले यांनी लागलीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली.       त्यानुसार पाणी विभागाचे अधिकारी श्यामसुंदर सोनावणे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत  ठाणकर पाडा येथील नागेश्वर मंदिर, कैलास कुंज, घोडेखोत अळी आदी परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या जाणून घेतली. येत्या ३ ते ४ दिवसांत येथील पाण्याची समस्या सोडवली जाईल असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.  

ठाणकर पाडा परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार ठाणकर पाडा परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads