Header AD

भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी,

 

मोटार सायकल चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश, गांजा , गावठी कट्टा 13 दुचाकी सह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त...भिवंडी दि 29(प्रतिनिधी )भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात दुचाकी व चैन स्नेचिंग च्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असताना वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने नऊ आरोपींच्या मुसक्या आवळीत विविध 16 गुन्ह्यांची उकल करीत 12 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  आहे .
            ज्यामध्ये दुचाकी चोरी ,घरफोडी ,दरोड्याचा प्रयत्न ,अमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे   शांतीनगर पोलीस अधिकारी यांनी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती घेऊन पिराणी पाडा शांती नगर येथील दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून भिवंडी सह नवी मुंबई ,मुंब्रा या भागातून चोरी केलेल्या 8 दुचाकी ,पाच बेवारस दुचाकी, दोन मोबाईल एक सोन्याची चैन असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .तर पोलीस गस्ती दरम्यान रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका कार मध्ये आढळून आलेल्या तिघा संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस,मिरची पूड ,कुकरी असे शस्त्र आढळून आले.              चौकशीत टेमघर येथील अशापुरा ज्वेलर्स दुकानावर त्यांचा दरोडा टाकण्याचा इरादा होता परंतु पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्या पूर्वीच आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले . तर गायत्री नगर दत्त मंदिरा जवळील घरातून 81 हजार 560 रुपये किमतीचा 4 किलो 78 ग्रॅम गांजा आढळून आला असून आरोपीस अटक करण्यात आली तर संजय नगर परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 10 हजार रुओए किमतीच्या नशे साठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे.         पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण ,सहा पो आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पो निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पोलीस पथकांनी या कारवाया करीत तब्बल 12 लाख 91 हजार 80 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत 16 गुन्ह्यांची उकल करून एकूण नऊ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे .
भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, Reviewed by News1 Marathi on June 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads