Header AD

दुर्गा फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात अन्न धान्याचे वाटप

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : दुर्गा फाऊंडेशनच्या माध्यमातून पनवेल मधील अत्यंत दुर्गम आदिवासी वाड्यात शेकडो गरीब कुटुंबाला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या आदिवासी पाड्यातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ होतो किंवा शासकीय योजना यांच्यापर्यंत पोहचतात का असा प्रश्न मनात येत असल्याची भावना शोभा भोईर यांनी व्यक्त केली आहे.


पहील्या लॉकडाऊन काळात पिचलेला आदिवासी बांधव अजूनही सावरलेला नाही. मागील कोरोना काळात दुर्गा फाऊंडेशन मार्फत अन्नधान्य,मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले होते. तर दुसऱ्या लॉकडाऊन काळात आदिवासी वाड्यात पुन्हा अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी दुर्गा फाऊंडेशनच्या संथापिका अध्यक्षा शोभा भोईर यांच्या मनात आल्याने त्यांनी आदिवासी भागात अन्नधान्य वापट करून शेकडो गरिबांच्या घराची चूल पेटवून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या मदतीने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.


यावेळी दुर्गा फाऊंडेशन संस्थापिका अध्यक्षा शोभा भोईर,रसिका म्हाञेज्योती चिवेसुरेखा माने,सारिका ठाकुरसिदधी श्रीवास्तव, अश्विनी पाटील आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थिती होत्या.  

दुर्गा फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात अन्न धान्याचे वाटप दुर्गा फाउंडेशन तर्फे आदिवासी पाड्यात अन्न धान्याचे वाटप Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि महिला पोलिसांचीही गस्त हवी महिला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वा लाखे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कक्ष आणि साध्या वेशातील पोलिसांसह महिला पोलिसांचीही प्रत्येक ठिकाणी गस्त हवी असल्याच...

Post AD

home ads