Header AD

ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगल्या संगीतोपयोगी कार्यशाळा!

 
ठाणे,  प्रतिनिधी  ;  समाजसेवेत तथा मनोरंजनक्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध ब्रह्मांड कट्टयाने संगीत शिक्षणाच्या दृष्टिने पाऊल उचलले असून ऑनलाईन माध्यमाद्वारे जून महिन्यात मोफत संगीत कार्यशाळा आयोजित केल्या  होत्या. मे महिन्यात आयोजित केलेल्या संगीत कार्यशाळा १ व २ च्या उदंड प्रतिसादानंतर जून महिन्यातील संगीत कार्यशाळा ५ जून व १३ जून २०२१ अशा दोन सत्रात पार पडल्या.             ऋजुता देशपांडे यांनी तांत्रिक तसेच सूत्रसंचालनाची दूहेरी बाजू सांभाळत अत्यंत साचेबद्ध पद्धतीने दोन्ही कार्यशाळांचा डोलारा सांभाळला. ऋजुता यांनी सुमधुर ईशस्तवनाने कार्यशाळेचा श्रीगणेशा केला व प्रभावी निवेदनाने कार्यशाळेतील सुसुत्रता अबाधित ठेवली. पहिल्या कार्यशाळेत ज्येष्ठ योगगुरु श्री. बापू भोगटे यांनी संगीतोपयोगी योगसाधना या विषयावर मार्गदर्शन केले. प्राणायाम, ॐकार आणि भ्रामरी अशा विविध संगीतासाठी उपयुक्त अशा योगप्रकारांची बापू यांनी सखोल माहिती दिली.            तर दुसऱ्या कार्यशाळेत  सुप्रसिद्ध संगीतकार व म्युज़िक प्रोग्रामर श्री. भारत शिंदे यांनी स्टुडियो रेकॉर्डिंग संदर्भातील तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले. भारत यांनी गाण्याची विविध अंग, डिजिटल रेकॉर्डिंग, माईकचे प्रकार व हाताळण्याचे तंत्र, स्टेज शो व रेकॉर्डिंग यातला फरक अशा अनेक तांत्रिक बाबींवर प्रकाशझोत टाकत मोलाचे मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रांमध्ये संगीतप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात रसिकांनी सक्रिय सहभाग दर्शवून तज्ञांकडून प्रश्नांचे शंकानिरसन करुन घेतले.            ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी तज्ञांचे आभार मानले. रसिकांचा सहभाग व आवड पहाता तसेच ज्ञानार्जनातील प्रगत पाऊल म्हणून ब्रह्मांड कट्टा पुढील कार्यशाळा लवकरच रसिकांच्या भेटीस घेऊन येणार आहे असे आवाहनही त्यांनी केले. या मोफत कार्यशाळा म्हणजे उत्तम गायक घडविण्यात कलासक्त ब्रह्मांड कट्टयाने उचललेला मोलाचा वाटा आहे यात वादच नाही.
ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगल्या संगीतोपयोगी कार्यशाळा! ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगल्या संगीतोपयोगी कार्यशाळा! Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads