Header AD

निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : "निरोगी तन व शांत मन" हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोरसोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नकामोठ्या प्रयत्नांनी  कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी  सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेमास्कचा कटाक्षाने वापर करणेहात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावाअसे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.
 कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता  नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबेश्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर "सुर नवाध्यास नवाआशा उदयाची "या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून  सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारशहर अभियंता सपना कोळी-देवनपल्लीउप आयुक्त पल्लवी भागवतउप आयुक्त विनय कुलकर्णीमहापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे  केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on June 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads