Header AD

वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा, ऑक्सीजन पूरक झाडे लावा महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आवाहनभिवंडी, प्रतिनिधी  ;  कोरोनाच्या काळात नागरिकांना ऑक्सीजनची आवश्यकता असते याची आता जाणीव झाली आहे, विशेष करून वड, पिंपळ, लिंब झाडांपासून नैसर्गिक पद्धतीने ऑक्सीजन  मिळतो ही बाब लक्षात घेता,  भारतीय प्रजाती असलेली ऑक्सीजनपूरक झाडे लावा, असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले. जागतिक पर्यावरण दिवसा निमित्ताने  आर.आर. पाटील प्ले ग्राऊड (नाना नानी पार्क)" आदर्शपार्क या परिसरात वृक्षरोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी महापौर प्रतिभा पाटील बोलत होत्या. भारतीय प्रजाती असलेली झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देतात ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पूरक  व पर्यावरण पूरक झाडे लावण्याचे आवाहन महापौर  प्रतिभा पाटील यांनी केले आहे.


               जागतिक माणसांची पर्यावरणविषयक जाणीवांची कक्षा रुंद व्हावी, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी पर्यावरण पोषक वातावरणाची निर्मिती होणं आवश्यक आहे. म्हणूनच आज 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महापौर यांनी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना पर्यावरण दिनानिमित्ताने  निसर्गसंपदेचे जतन करु, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध होऊ.प्रगतीच्या वाटेवर चालताना पर्यावरण संवर्धनाचे भान ठेऊयात, निसर्गाची अनमोल देणगी मनोभावे जपूया अशी शपथ दिली.


            या कार्यक्रमास शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहायक आयुक्त तथा  उद्यान विभाग प्रमुख श्री.नितीन पाटील, प्रभाग समिती क्रमांक 5 चे सहायक आयुक्त गिरीष घोष्टेकर , जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, पर्यावरण विभाग प्रमुख श्री.नितेश चौधरी, कोरोना  योद्धा म्हणून काम करणारे प्रभाग समिती 5 चे मुख्य आरोग्य निरीक्षक शशिकांत घाडगे, आरोग्य निरीक्षक हरेश गायकवाड, सुमित कांबळे,निलेश शेलार  तसेच उद्यान विभागातील   कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. कोरोना योद्धा म्हणून काम करणारे आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते देखील  वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा, ऑक्सीजन पूरक झाडे लावा महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आवाहन वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा, ऑक्सीजन पूरक झाडे लावा  महापौर प्रतिभा पाटील  यांनी केले आवाहन Reviewed by News1 Marathi on June 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads