Header AD

भिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ...

 भिवंडी दि 07  (प्रतिनिधी )  शहरात शांतीनगर परीसरात नशेच्या उपयोगी आणले जाणारे कफ सिरप घेऊन एक जण येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलोस निरीक्षक शीतल राऊत यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली असता त्यांनी पोलीस पथक तैनात करीत खंडूपाडा येथे सापळा रचून दुचाकीवर आलेल्या संशयित इसमास ताब्यात घेत त्याच्या कडील सामानाची झडती घेतली असता त्याच्या जवळ तब्बल 240 Phencyrex या कफ सिरप च्या बाटल्या व Acan - 1 या बटन गोळी या प्रचलित नावाने ओळखल्या नशे करीता वापरल्या जाणाऱ्या बटन गोळी यांचे पॅकेट आढळून आले.           त्या सोबतच भादवड पोगाव पाईपलाईन रस्त्यावर मॅफड्रिन घेऊन येणाऱ्या संशयिता बाबत माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेत त्याच्या जवळून 36 हजार रुपये किमतीचे 18 ग्रॅम मॅफड्रिन हे मादक पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .या संदर्भात पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे..
भिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ... भिवंडीत नशेसाठी वापरला जाणारा कफ सिरप सह एम डी पावडर जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश ... Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads