Header AD

कल्याणात ६ सापांना सर्प मित्रांनी दिले जीवदान

 

■डुरक्या घोणस, २ धामण, एक नाग, धूळ नागीण, दिवड सापांचा समावेश...


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  रविवारी कल्याण मध्ये सर्पमित्रांनी ६ सापांना जीवनदान दिले आहे. यामध्ये डुरक्या घोणस, २ धामण, धूळ नागीण आणि दिवड  या सापांचा समावेश आहे. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजावकर या दोघांनी हि कामगिरी केली आहे.


 कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील बितुल सोसयटी परिसरात भक्ष्य गिळंकुत करण्याच्या तयारीत असलेल्या साडेचार फुटी लांब सापाला पाहुन पाहणाऱ्याची भांबेरी उडली.        रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास डुरक्या साप आपले भक्ष्य उंदीर गिळंकृत करण्याच्या स्थितीत आढळल्याने बाघ्याची भितीने धादंल उडली स्थानिक रहिवाशी वाजपेयी यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला. घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत डुरक्या या साडे चार फुटी घोणस सापास पकडले.


  डुरक्या सापाचे वैशिष्ट्य असे की  उंदीरघुशीसरडे यांना पकडल्या नंतर आवळुन त्यांचा श्वास बंद झाल्यानंतर भक्ष्य गिळंकृत करतो हा घोणस प्रकारात मोडत असून बिनविषारी साप आहे. या  डुरक्या सापाबाबत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी उपस्थितीता मध्ये जन जागृती करीत जीवनदान दिलेल्या डुरक्या सापास वनपाल एम्. डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले.


       तर खडकपाडा प्रफुल सोसायटीमध्ये दिवड साप, उंबर्डे गावांमध्ये आठ-नऊ फुटाची धामण तर सापर्डे गावामध्ये धूळ नागीन मिळाली असल्याची माहिती सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिली.

कल्याणात ६ सापांना सर्प मित्रांनी दिले जीवदान कल्याणात ६ सापांना सर्प मित्रांनी दिले जीवदान Reviewed by News1 Marathi on June 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads