Header AD

गृह संकुलांतून होणार हजारो नागरिकांचे लसीकरण आमदार संजय केळकर यांचा पुढाकार
ठाणे, प्रतिनिधी  ;  खासगी रुग्णालयांच्या मदतीने ठाण्यातील गृह संकुलांमधून हजारो नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या आठवड्यात १० हजार नागरिकांचे लसीकरण होणार असून खासगी रुग्णालयांना जशा लसी उपलब्ध होतील त्याप्रमाणे हजारो नागरिकांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देऊ, असे आ. संजय केळकर यांनी सांगितले.           आमदार संजय केळकर यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी देण्याची मागणी केली होती. या मागणीस मान्यता दिल्यानंतर आ. केळकर यांच्या पुढाकाराने खासगी रुग्णालयाचे सहकार्य घेऊन गृह संकुलांमध्ये लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. आज ठाण्यातील ढोकाळी येथील एव्हरेस्ट गृह संकुलात आ. संजय केळकर अध्यक्ष असलेली संस्कार सेवाभावी संस्था आणि सिद्धिविनायक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री. केळकर बोलत होते.              पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लसीकरण धोरणामुळे देशवासीयांना दिलासा मिळाला आहे. या लसीकरणाला गती मिळावी यासाठी खासगी रुग्णालयांच्या मदतीने ठाण्यातील गृह संकुलांमध्ये हजारो नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. या कार्यात सामाजिक कार्यकर्त्यांचेही सहकार्य मिळत असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. सिद्धिविनायक रुग्णालयाच्या सहकार्याने या आठवड्यात १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.                आमच्या या मोहिमेत इतर खासगी रुग्णालयेही सहकार्या साठी पुढे येत आहेत. त्यामुळे गृहासंकुलांतून हजारो नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळवून देऊ, असा विश्वास श्री. केळकर यांनी व्यक्त केला. केंद्राने जाहीर केलेल्या दराप्रमाणेच लसींचा दर असून १८ वर्षांपासून ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांनाच याचा लाभ मिळवून देणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. आपण सारे मिळून खासगी आणि सरकारी लसीकरणाला गती देऊ, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

गृह संकुलांतून होणार हजारो नागरिकांचे लसीकरण आमदार संजय केळकर यांचा पुढाकार गृह संकुलांतून होणार हजारो नागरिकांचे लसीकरण आमदार संजय केळकर यांचा पुढाकार Reviewed by News1 Marathi on June 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads