Header AD

पहिल्याच पावसाने केला केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल पावसामुळे कल्याण डोंबिवली झाली जलमय

 

■अनेक नागरिकांच्या घरात शिरले पाणी नालेसफाई कि अधिकारी ठेकेदारांची हातसफाई ? नागरिकांचा संतप्त सवाल... 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  बुधवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. पडलेल्या या पावसामुळे कल्याण डोंबिवली जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर  अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे हि नालेसफाई आहे कि अधिकारी ठेकेदारांची हातसफाई असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.    वेध शाळेने बुधवार पासून  मुसळधार पाऊस पडण्याचा व्यक्त केलेला अंदाज प्रथमच तंतोतंत खरा ठरला असून बुधवारी पहाटे पासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने दिवसभर पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरातील सखल भागातील चाळी मध्ये पाणी शिरले होते तर सर्वच प्रमुख रस्त्या लगतची नाले व गटारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहाऊ लागल्याने रस्त्यावर कृत्रिम तलाव निमान झाले होते. यंदाही पालिकेची कोट्यावधी रुपयांची नालेसफाईची केलेली कामे थुकपट्टी लावून केल्याने पहिल्याच पावसात नाले सफाईचा पोल खोल झाला आहे.       पहाटेपासून जोरदार एन्ट्री केलेल्या पावसाने कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते जलमय केले. तर काही सखल भागात आणि घरात गटाराचे पाणी भरल्याने नागरिकांची गैरसोय केली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाची दुपारी १२ पर्यंत ८३.५ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे. सुरवातीला काही तास बरसलेल्या पावसाने सखल भागात आणि गटारे तुडुंब भरल्याने नालेसफाईबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.           सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने सखल भागात आणि कल्याण शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दृश्य पाहायला मिळाले. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना काही जणांच्या दुचाकी बंद पडल्या. तर काहींना त्याच पाण्यातून वाट काढत जावे लागले. कल्याण पशचिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकटिळक चौकसहजानंद चौकडॉ बाबासाहेब आंबेडकर रोडबेतूरकर पाडा ते खडकपाडा संपूर्ण रस्ता आदींसह सखल भागात पाणी साचले होते. तर कल्याण पूर्वेतील काही भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे समोर आले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. दुपारी १ नंतर पाऊस कमी झाला.               प्र. क्र.४० वालधुनी नाकाछ.शिवाजी महाराज नगरकल्याण पूर्व येथील रस्त्यावर देखील पाणी साचले होते. येथील नालेसफाई बाबत मनसे विद्यार्थी सेनेचे कल्याण शहर उपाध्यक्ष सतीश उगले यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील पालिकेने याठिकाणी नालेसफाई केली नसल्याचा आरोप सतीश उगले यांनी केला आहे. तर अटाळी स्मशानभूमी रोड येथील दत्ता माया पाटील चाळराजाराम पाटील चाळ या चालीमधील काही खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होतेबिल्डर फक्त रूम बनवतात मात्र गटार नाले न बनवता तसेच सोडून देतातया मुळे लोकांच्या घरात पाणी शिरतेपावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करीत नाहीपालिका देखील काही करीत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया चाळीतील नागरिकांनी दिली.तर कल्याण ग्रामीण भागात देखील नालेसफाई न झाल्याने ग्रामीण भागातील आडीवली ढोकळी येथील परिसर जलमय झाला होता. याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारीअर्ज व पत्र करून देखील कल्याण ग्रामीण परिसरातील नालेसफाई,गटार सफाई झाली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले असून, नागरिकांच्या घरा-दारात पाणी गेलंय. पहिल्याच पावसात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, या संपूर्ण परिस्थितीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हे याला जबादार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे. नालेसफाईसाठी वारंवार पत्रे दिलीअर्ज दिलेविनवण्या केल्या तरी महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांचे काही नुकसान झाल्यास अथवा रोगराई व इतर काही त्रास झाल्यास या सर्वांसाठी महानगरपालिका व अधिकारी जबाबदार असतील असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.एकंदरीतच पालिकेने केवळ मोठ्या नाल्यांच्या सफाईकडे लक्ष देऊन इतर नाल्यांकडे दुर्लक्ष करीत केवळ त्यांचे टेंडर काढून ठेकेदार आणि संबधित अधिकाऱ्यांनी नालेसफाईत हातसफाई केली असल्याची टीका सर्वसामान्य करदाते नागरिक करत आहेत. तसेच आयुक्तांनी केवळ मोठ्या नाल्यांचे पाहणीदौरे न करता छोटे नालेसफाईच्या कामांचा देखील पाहणीदौरा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. 

पहिल्याच पावसाने केला केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल पावसामुळे कल्याण डोंबिवली झाली जलमय पहिल्याच पावसाने केला केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल पावसामुळे कल्याण डोंबिवली झाली जलमय Reviewed by News1 Marathi on June 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads