Header AD

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने ८ दिवसांत जमिनीचा जादा मोबदला केवणी दिवेतील शेतकऱ्यांना दिलासा

 
भिवंडी, ता. २४ (प्रतिनिधी) : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनीचा केवणीदिवे येथील दर कमी असल्याबद्दल खासदार कपिल पाटील यांनी आवाज उठविल्यावर, अवघ्या ८ दिवसांत जमिनीच्या मोबदल्यात वाढ झाली आहे. आता खारबावप्रमाणेच केवणीदिव्यातील शेतकऱ्यांना प्रती गुंठा ११ लाख २८ हजार रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खासदार कपिल पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
              मुंबई-अहमदाबाद अति जलद बुलेट ट्रेनचा मार्ग भिवंडी तालुक्यातून जात आहे. या मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. मात्र, खारबाव व केवणीदिवे येथील जमिनीच्या मोबदल्यामध्ये तफावत ठेवण्यात आली होती. खारगावमध्ये प्रती गुंठा ११ लाख २८ हजार रुपये मोबदला दिला जात होता. तर केवणी दिवा परिसरात प्रती गुंठा ७ लाख ६३ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भूसंपादनाला विरोध केला जात होता. खारबाव गावाप्रमाणेच केवणीदिवा परिसरातील भूसंपादनाचा दर ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.               या संदर्भात खासदार कपिल पाटील यांना शेतकऱ्यांनी साकडे घातले होते. बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन व पुनर्वसन वसाहत समितीची आठ दिवसांपूर्वी ऑनलाईनद्वारे बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर होते. तर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. त्यात खासदार कपिल पाटील यांनी केवणीदिव्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.              तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. तसेच खारबाव व कोपरप्रमाणे जादा दर दिल्यास शेतकरी जमीन द्यायला तयार होतील, अशी सूचना खासदार पाटील यांनी केली. त्याबाबत तत्काळ विचार करणार असल्याचे आश्वासन बुलेट ट्रेनचे अधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार बुलेट ट्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवणीदिवा परिसरातील भूसंपादनाच्या दरात प्रती गुंठा ३ लाख ६३ हजार रुपये वाढ केली.-------------------
भिवंडी तालुक्यातील
७५ टक्के जमीन अधिग्रहीत
बुलेट ट्रेनच्या मार्गात भिवंडी तालुक्यातील १२ गावे येत असून, या गावातील ७५ टक्के जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. आता केवणीदिव्यातील शेतकऱ्यांची मागणी झाल्यामुळे केवणीदिव्यातील भूसंपादनाचे कामही लवकरच पूर्ण होईल.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने ८ दिवसांत जमिनीचा जादा मोबदला केवणी दिवेतील शेतकऱ्यांना दिलासा भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने ८ दिवसांत जमिनीचा जादा मोबदला केवणी  दिवेतील शेतकऱ्यांना दिलासा Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads